जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२३
एकट्या राहत असलेल्या सपना ऊर्फ स्वप्ना जगदीश भोई (३१, रा. हरिविठ्ठलनगर ) या | महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री मयत महिलेची बहीण घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरिविठ्ठलनगर परिसरात मजुरी काम करणाऱ्या सपना भोई या एकट्याच राहत होत्या. त्यांनी मंगळवार १७ ऑक्टोबर रोजी साडीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या घराच्या मागील गल्लीत राहणारी त्यांची बहीण मंगलाबाई ढोले या सपनाच्या घरी आल्या. त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा उघडताच त्यांना बहिणीने गळफास घेतल्याचे दिसले. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले.