जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२४
निवडणुक काळात बदली झालेले किंवा बदलून आलेल्या १२ सहाय्यक पोलीस निरीख व उपनिरीक्षक या दुय्यम अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.
विधानसभा निवडणुकीपुर्वी झालेल्या बदल्यामध्ये एकाच पोलीस ठाण्यात कार्यकाळ पुर्ण झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तसेच इतर जिल्ह्यातून देखील अधिकारी बदली होवून आले होते. त्यांना तात्पुरता पदस्थपना देण्यात आली होती. दरम्यान निवडणुक संपताच या बारा सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुपारी काढलेत.
जनसंपर्क अधिकारी म्हणून असलेले सपोनि शितलकुमार नाईक यांची शहर पोलीस ठाणे, जिविशातील अनिल मोरे यांची भुसावळ शहर, दंगा नियंत्रण पथकातील निलेश गायकवाड यांची भुसावळ बाजारपेठ, जिविशातील राहूल मोरे यांची यावल, जामनेर पोलीस ठाण्यातील सागर काळे यांची भडगाव तर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक जगदाळे यांची डायल ११२ व नियंत्रण कक्षात, एमआयडीसीतील शरद बागल यांची स्थानिक गुन्हे शाखा, जिविशातील राहूल तायडे यांची एमआयडीसी, नियंत्रण कक्षातील योगेश ढिकले यांची शनिपेठ, शनिपेठ पोलीस ठाण्यातील चंद्रकांत धनके यांची एमआयडीसी, चोपडा शहर येथील विजय देवरे यांची नियंत्रण कक्षात तर भडगाव येथील शेखर डोमाळे यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे