जळगाव मिरर | ७ जून २०२४
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची धामधूम संपल्यानंतर सत्ता स्थापन येत्या दोन दिवसात होत असतांना या सर्व घडामोडींचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. व्यापार क्षेत्रात तेजीचे सत्र दिसून येत आहे. निकालापूर्वी सोने-चांदी घसरले होते. आता मौल्यवान धातूत मोठी उसळी दिसून येत आहे. सोने-चांदीची अशी आहे किंमत
या आठवड्यात 3 जून रोजी 440 रुपयांची घसरण झाली होती. 4 जून रोजी सोन्याने 700 रुपयांची भरारी घेतली होती. 5 जूनला सोने 220 रुपयांनी कमी झाले. तर 6 जून रोजी 700 रुपयांनी सोन्याने मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या आठवड्यात 3 जून रोजी चांदी 700 रुपयांनी उतरली. 4 जूनला चांदी 1200 रुपयांनी महागली. 5 जूनला 2300 रुपयांनी चांदी आपटली. तर 6 जून रोजी 1800 रुपयांनी भाव वधारले. चांदी अजून भरारी घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,500 रुपये आहे.