जळगाव मिरर | २ मार्च २०२५
सावदा येथील मोठा वाघोदा येथे बऱ्हाणपुर अंकलेश्वर महामार्गावरुन अवैधरित्या गोवंशाची वाहतुक करणारे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी हल्लेखोरांनी गोरक्षांसह पोलीस पाटील यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सहा संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली.
कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गोवंशाची वाहन थांबविणाऱ्या गोरक्षकांवर वाघोदा येथील चाळीस ते पन्नास हल्लेखोरांनी हल्ला केला होता. यामध्ये पोलीस पाटील परशुराम भोसले, गौरक्षक कुलदीप पवार, केतन पाटील, निखिल महाजन, कुणाल नारखेडे, यांना बेदम मारहाण केली. यातील गौरक्षक कुलदीप पवार यांच्या कडील महागडा मोबाईल हिसकावून घेतला होता. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यासह आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकात पाटील यांनी भेट दिली.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित बबलू उर्फ फिरोज तडवी, शरीफ भिकारी तडवी, तौसिफ शरीफ तडवी, सय्यद फैजान सय्यद, शेख आम शेख रऊफ, तौसिफ मलक, सुबान माना तडवी, रमजान सुबान तडवी, रमजान रसूल तडवी, रहीम सलीम तडवी, सर्व राहणार वाघोदा बुद्रुक यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने निषेध केला. हल्लेखोरांसह संशयितांसोबत पळालेले गोस्तकर व वाहनाचा कसून शोध घ्यावा. तसेच जिल्ह्यातील अवैध गोवंशाची तस्करी व कत्तलखाने महिनाभराच्या आत बंद करावे अन्यथा हिंदूत्ववादी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी दिला आहे.