
जळगाव मिरर / १० नोव्हेंबर २०२२
अमळनेर तालुक्यातील झाडी येथील ग्रामरोजगार सेवकाने पंचायत समितीच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला.
तालुक्यातील झाडी ग्रामपंचायतीत संदीप पाटील ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत होता, मात्र कुठलीही नोटीस न देता त्याला काही महिन्यांपासून कामावरून काढून टाकल्याने त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.यावेळी पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.




















