जळगाव मिरर | ३ जुलै २०२५
तालुक्यातील एका गावात दि. ३० रोजी रात्रीच्या सुमारास रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात झोपलेली असतांना संशयित सुर्यभान सपकाळे याने घरात प्रवेश करीत मुलीचे तोंड दाबून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संशयिताविरुद्ध पोस्कोतंर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दि. ३० रोजी ही मुलगी रात्रीच्या सुमारास घरात एकटीच झोपलेली असल्याची संधी साधत संशयित सुर्यभान सपकाळे हा घरात शिरला. त्याने मुलीचे तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने त्याला विरोध केला असता, संशयिताकडून तीला जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार मुलीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. १ रोजी तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित सुर्यभान सपकाळे यांच्याविरुद्ध पोस्कोतंर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि अनंत अहिरे करीत आहे.
