जळगाव मिरर | १४ मे २०२४
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्पयातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये जळगाव लोकसभा मतदार संघात सरासरी ५८ तर रावेर लोकसभा मतदार संघात सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाली नव्हती.
सद्या देशात लोकसभा निवडणुकची रणधुमाळी सुरु असून चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. यामध्ये जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. दोन्ही मतदार संघातील सुमारे तीन हजार पेक्षा अधिक मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. सकाळपासून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे सायंकाळपर्यंत मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. दरम्यान, जळगाव लोकसभा मतदार संघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५२ टक्के मतदान झाले होते, तर रावेर लोकसभा मतदार संघात सरासरी ५६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर देखील दोन्ही ठिकाणी मतदानाची प्रक्रीया सुरु होती.
सखी वन स्टॉप सेंटरमध्ये समुपदेशनासाठी येणाऱ्या १६ महिलांनी मतदान केले आहे. यामध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांच्या अंतर्गत समुपदेशन सेंटरमध्ये आलेल्या पीडित २४ महिलांचे मतदान झाले. सहा महिला बाहेरगावी व काहींचे मतदान गुजरात येथील असल्यामुळे ते होवू शकले नाही. या सर्व महिलांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार मतदानासाठी जागृत करण्यात आले होते.