मेष राशी
आज काहीतरी विशेष साध्य करण्यासाठी तुम्ही मेहनत कराल. घरात एखादी खरेदीही होऊ शकते. अडचणीत असलेल्या जवळच्या व्यक्तीला मदत करून तुम्हाला समाधान मिळेल. नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, अन्यथा आत्मसन्मानाला धक्का बसू शकतो. अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. निर्णय घेण्यात अडचण आल्यास ज्येष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबात योग्य वातावरण टिकून राहील.
वृषभ राशी
आज घेतलेला कोणताही महत्त्वाचा निर्णय तुमच्यासाठी चांगला ठरेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभदायक ठरेल. कार्यक्षेत्रातील उपक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकता. मात्र अति आत्मविश्वास अडचणी निर्माण करू शकतो, त्यामुळे शांतपणे परिस्थिती हाताळा. बोलताना नकारात्मक शब्दांचा वापर करू नका. गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल नाही. व्यवसायाचे कामकाज सामान्य राहील.
मिथुन राशी
घाई करण्याऐवजी शांतपणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सर्व कामे योग्यरीत्या पार पडतील. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन व संतुलित विचार समस्यांचे निराकरण करेल. मात्र अति विचार करून संधी हुकवू नका. योजना आखल्यानंतर ती सुरू करणेही गरजेचे आहे. गर्विष्ठपणा टाळा. मार्केटिंगसंबंधित कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम वेळ आहे. घरगुती वातावरण आनंदी राहील.
कर्क राशी
मनाप्रमाणे उपक्रमांमध्ये वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल. नवीन माहिती मिळेल. मुले व तरुण वर्ग शिक्षण व करिअरवर लक्ष केंद्रित करतील. इतरांच्या बोलण्यावर अति विश्वास ठेवल्यास स्वतःचे नुकसान होऊ शकते. नकारात्मक विचार मनात येतील, संयम व चिकाटी ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा.
सिंह राशी
महिलांसाठी आजचा दिवस आरामदायी असेल. नवीन योजना आखली जाईल व ती लाभदायक ठरेल. तुमचा संवाद कौशल्य इतरांना आकर्षित करेल. अति कामामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. जुन्या नकारात्मक आठवणींनी ग्रासू देऊ नका; वर्तमानात जगायला शिका. घाईपेक्षा शांतपणे काम पूर्ण करा. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. घरगुती वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील.
कन्या राशी
ग्रहस्थिती अनुकूल आहे. अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी होईल. दिनचर्येत सकारात्मक बदल होईल. सामाजिक उपक्रमातही सहभाग घ्याल. मुलांच्या प्रवेशासंबंधी गोंधळ निर्माण होईल. आज प्रवास टाळा. आळस किंवा अति चर्चेमुळे वेळ वाया जाऊ नये याची काळजी घ्या. व्यवसायात सुधारणा होण्याची शक्यता. वैवाहिक जीवन गोड राहील.
तुळ राशी
मेहनत करून व भविष्यातील उद्दिष्टांसाठी कार्य करून तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक बाबींमध्ये तुमचा निर्णय महत्त्वाचा ठरेल. भावंडांशी तणाव निर्माण होऊ देऊ नका. अति शारीरिक श्रम टाळा. बाहेरच्यांशी व्यवहार करताना सावध राहा, काही लोक स्वार्थासाठी वापरू शकतात. काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. जोडीदार व कुटुंबासोबत खरेदी व मौजमजेत वेळ जाईल.
वृश्चिक राशी
जुन्या मतभेदांचा निपटारा होईल. तुमचे साहस व निष्ठा महत्त्वाचे काम पूर्ण करू शकतील. मुलांशी संबंधित समस्येचे निराकरण होईल. कुणाकडून चांगली बातमी मिळू शकते. महत्त्वाच्या वस्तू जपून ठेवा. कल्पनांच्या दुनियेतून बाहेर पडून वास्तव समजून घ्या. अति विश्वास नुकसानकारक ठरू शकतो. व्यवसायात प्रयत्न अधिक व नफा कमी राहण्याची शक्यता आहे. पती-पत्नींमध्ये सुसंवाद राहील.
धनु राशी
आज आत्मचिंतनासाठी योग्य वेळ आहे. बदलीसंबंधी योजना असल्यास ती योग्य ठरेल. जवळच्या मित्रासोबत प्रवास होईल व जुन्या आठवणी ताज्या होतील. इतरांच्या बाबतीत हस्तक्षेप टाळा, अन्यथा नुकसान होईल. जवळच्या व्यक्तीशी वाद झाल्यास घरगुती वातावरणावर नकारात्मक परिणाम होईल. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात.
मकर राशी
आज ग्रहस्थिती अनुकूल आहे. दु:खात गुरफटून न जाता उभारी घ्या. गुंतवणूक योजना लाभदायक ठरतील. मुलांवर अति बंधने घालू नका, अन्यथा आत्मविश्वास कमी होईल. नकारात्मकतेला मनावर घेऊ नका. कार्यक्षेत्रात सर्व कामे स्वतः व्यवस्थित करा. घरगुती वातावरण आनंदी ठेवण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवा.
कुंभ राशी
केलेल्या चांगल्या कार्यामुळे समाजात मान-सन्मान मिळेल. महत्त्वाच्या कामात गुंतवणुकीचा विचार असल्यास काळ अनुकूल आहे. सर्वांना खूश करण्याच्या प्रयत्नात स्वतःचे नुकसान होऊ शकते, म्हणून काम मनापासून करा. स्वतःच्या वस्तू सांभाळा, विसरण्याची शक्यता आहे. विद्यमान व्यवसायासोबत नवीन कामाची आवड वाढेल.
मीन राशी
आत्मविश्वास व समजुतीने तुम्ही कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकता. भविष्यातील योजना सध्या प्रभावी ठरतील. विद्यार्थ्यांना एखाद्या प्रकल्पात अपयश आल्यास निराश होऊ नये, पुन्हा प्रयत्न करा. घरगुती बदल करण्यापूर्वी बजेटचा विचार करा. कामकाजाच्या पद्धतीत बदल व्यवसायासाठी चांगला ठरेल. कामाचा ताण जास्त असल्याने कुटुंबासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे.