जळगाव मिरर | २६ मे २०२५
राज्यातील सातारा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असून नदी – नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. त्यामुळे वाहन चालवणे अवघड झाले आहे. यातच सातारा जिल्ह्यातील एका तरुणाने चक्क दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार केला. सातारा जिल्ह्यातल्या कुळजाई गावात हा प्रकार घडला. सरकारने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी. किमान चालता यावे आणि वाहन नेता यावी, ही माफक अपेक्षा असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
पावसामुळे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कुळकजाई गावातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट झाली आहे. त्यामुळे विनय घोरपडे या तरुणाला खांद्यावर दुचाकी घेऊन रस्ता ओलांडावा लागला. सहसा लोक दुचाकीवर बसून रस्ता ओलांडतात, परंतु कुळकजाई गावात पावसामुळे रस्ते पूर्णपणे चिखल आणि खड्ड्यांनी भरले आहेत. अशा परिस्थितीत वाहन चालवणे अशक्य झाले आहे आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सरकार आणि संबंधित विभागाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी केली जात आहे.
पावसाळ्यामुळे सर्व रस्ते चिखलयुक्त झाले असून खड्ड्यांमध्ये देखील पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालवणे अशक्य बनले आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी आणि तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी देखील आता या प्रकरणात होत आहे.
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आदी गावांत पावसामुळे रस्ते पूर्णतः बंद झाले आहेत. त्याचबरोबर मान, खटाव, फलटण आदी दुष्काळी तालुक्यात देखील पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे रस्ते बंद झाले असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. दुसरीकडे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने पूरग्रस्तांना मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान खात्याने मान्सून मुंबईत दाखल झाल्याची घोषणा केली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, मराठवाड्याच्या उस्मानाबादपर्यंत मान्सून पोहोचला आहे. मुंबईत सकाळी 8.30 वाजेपर्यंत 135.5, तर सांताक्रूझमध्ये 33.5 मिलिमीटर पाऊस झाला आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील हार्ट रिजनमध्येही हा अलर्ट देण्यात आला आहे.
