जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२५
राज्यातील पुणे येथील अत्याचार प्रकरण ताजे असताना आता नालासोपारा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून पोटच्या तीन मुलींवर विकृत वासनांध बापाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नालासोपारा येथे पोटच्या तीन मुलींवर 56 वर्षीय बापाने लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेतील पीडित तीन मुलींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची आहे. तर दोन मुली अल्पवयीन आहेत. विशेष म्हणजे यातील एका मुळीच चारवेळा गर्भपात देखील करण्यात आलेला आहे. आरोपी बाप हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर दरोडा, चोरीचे गुन्हे देखील दाखल आहे. मुली आणि पत्नीला दहशतीत ठेऊन तो हे कृत्य करत होता. काल पीडित मुलींची आई आणि तिन्ही मुलींनी हिम्मत करून नालासोपारा पोलीस ठाण्यात वडिलांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी बापावर बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
