गेल्या काही वर्षापासून जगभरातील अनेक वेगवेगळे व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. यात आता एक नवीन व्हिडीओची भर पडली आहे. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. अशात एक किंग कोब्रा साप थेट एका व्यक्तीच्या बुटात सापडला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. बाहेर जाताना सर्व तयारी झाल्यावर अनेक जण घाईघाईत चपला, बुटे घालतात आणि बाहेर पडतात. आता तुम्हीही असं करत असाल तर सावधान. कारण तुमच्याही बुटांमध्ये किंग कोब्रा लपलेला असू शकतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एका व्यक्तीच्या बुटांमध्ये किंग कोब्रा लपून बसलेला आहे.
Cobra trying a new footwear😳😳
Jokes apart, as the monsoon is coming to a close, please be extra careful. pic.twitter.com/IWmwuMW3gF— Susanta Nanda (@susantananda3) October 5, 2023
या व्यक्तीने बुट घालण्यासाठी बाहेर काढताच त्यातून किंग कोब्राने डोकं वर काढून फना काढला. भारतीय वन सेवा सुंशांत नंदा यांनी ५ ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.एकाने यावर लिहिलंय की, सापाची नवीन चप्पल. तर आणखी एका नेटकऱ्याने यावर भीती व्यक्त केली आहे. सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत सर्व नागरिकांना आपली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.