
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रामेश्वर कॉलनी येथे एका महिलेला मारहाण करीत शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबत ६ ऑगस्ट शनिवार रोजी एमआयडीसी पोलिसात परस्पर तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोदं करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामेश्वर कॉलनी येथे ६ ऑगस्ट रोजी येथील रहिवासी कल्पना शामराव मोरे यांना शकील पिंजारी रा. मेहरुण, खातूनबी या दोन जणांनी मागील भांडणाच्या कारणावरुन धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. कल्पना मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शकील पिंजारी व खातूनबी या दोन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.




















