जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२४
हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरुन चार जणांना लोखंडी पाईपसह लाकडी दांडवाने मारहाण करण्यात आली. ही घटना दि. २० एप्रिल रोजी रात्री दहा वाजता जळगाव तालुक्यातील तरसोद येथील बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी रविवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील तरसोद गावात शनिवार दि. २० एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून सागर शांताराम राजपूत (वय २९) या तरुणाला गावात राहणारे प्रवीण भगवान अलकारी, विनोद भगवान अलकारी, सागर विनोद अलकारी आणि संतोष तुळशीराम राजपूत या चार जणांनी लोखंडी पाईप, लाकडी दांडका आणि विटा मारून दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. तरुणाला मारत असताना भांडण सोडवण्यासाठी आलेले धीरज रमेश राजपूत, गिरीश बापू राजपूत आणि योगेश अशोक राजपूत यांना देखील लाकडी दांड्याने व विटांनी मारहाण करून दुखापत केली आहे.
या घटनेबाबत शनिवारी दुपारी नशिराबाद पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार मारहाण करणारे प्रवीण भगवान अलकारी, विनोद भगवान अलकारी, सागर विनोद अलकारी आणि संतोष तुळशीराम राजपूत सर्व रा. तरसोद ता. जळगाव या चौघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आलियार खान हे करीत आहे.
