जळगाव मिरर / ७ फेब्रुवारी २०२३
जामनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा एका अनोळखी इसमाने विनयभंग केल्या प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथिल अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता अल्पवयीन मुलगी ही दुकानावरून दूध घेऊन घरी येत असताना अज्ञात मुलाने अंधाराचा फायदा घेत तिचा हात पकडून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार पीडित मुलीने घरी जाऊन आई-वडिलांना सांगितला. संतप्त झालेल्या पीडीत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.