
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
लहानपणापासून एखाद्या व्यक्तीने जे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी परिस्थितीशी दोन हात करून भविष्यात ते स्वप्न साकार झाले तर आई-वडिलांसह आपल्या गावाचाही अभिमान उंचावणारे गोष्ट घडते तशीच काहीशी घटना अमळनेर शहरात घडले एक सर्वसाधारण कुटुंबात वावरत असताना एका मुलीने आपले स्वप्न सत्यामध्ये उतरवून आपल्या परिवाराचा नाव उंचावले आहे.
शहरातील मुंदडा नगरात देविदास पाटील यांच्या कन्या कांचन हिने नुकतेच बी एच एम एस परीक्षेत यश संपादन केले पुण्याच्या धोंडू मामासाठी होमिओपॅथी मेडिकल महाविद्यालयातून त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली आहे. कांचनचे वडील देविदास शहादु पाटील हे तिच्या जन्मापासून फोटोग्राफीचा व्यवसाय असलेले त्यानंतर माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असताना कांचनने कधीच आई-वडिलांकडे कुठल्याही गोष्टीचा हट्ट न करता अभ्यासाकडे लक्ष दिले. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेली कांचन अंमळनेर आतील लोकमान्य विद्यालयात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतर आईला घरातील कामाचा व्याप वाढल्याने आईने तिला कुठल्याही कामात वेळ न देता सातत्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असे सांगून कांचन च्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. तर दुसरीकडे कांचनला एक लहान भावाचा नेहमी अभ्यास घेण्यात कांचन व्यस्त असे त्याचप्रमाणे त्या अभ्यासात तिचाही अभ्यासाला वेळ देत तिने आज डॉक्टर या उच्च क्षेत्रात एक भरारी घेऊन परिवाराचे नाव उंचावले आहे. मुली म्हणजे अठरा वर्ष झाले बारावीचे शिक्षण झाले की आई वडील तिचा विवाह सोहळा लावून संसाराला लागण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतात पण कांचनने याबाबतीत कुठलाही विचार न करता प्रथम अभ्यास व डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारल्यावरच पुढचे बघू असे परिवाराने गाठ बांधली होती. लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणाऱ्या कांचन ने आज ते स्वप्न साकार केले आहे.




















