
जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२५
जळगाव शहरातील काही परिसरात भिशी लकी ड्रॉ पद्धतीने सुरू झाली आहे यामध्ये अनेक गोरगरीब व श्रीमंत व्यक्तींनी आपली मोठी रक्कम गुंतवली आहे. यात काहींना लकी ड्रॉ लागत आहे तर काहींना लागत नाही त्यामुळे अनेक व्यक्ती आज कंगाल होण्याच्या मार्गावर आली आहे. त्यामुळे शहरातील या भिशीवर कुणाचा अंकुश आहे का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमध्ये विचारला जाऊ लागला आहे.
शहरातील अनेक छोट्या-मोठ्या वस्तीमध्ये काही व्यक्ती गोरगरीब पासून तर मध्यमवर्गीयपर्यंत मोठी साखळी पद्धत निर्माण करून भिशी म्हणजेच लकी ड्रॉ पद्धत सुरू केली आहे. यामध्ये अनेक व्यक्तींचे लाखो रुपये अडकवून लकी ड्रॉ पद्धतीने नंबर काढला जातो. यामध्ये काहींना नंबर लागतो तर काहीना अखेरपर्यत वाट बघावी लागते. यामध्ये शेवटची ३० टक्के व्यक्तींचे नंबर लागतात तर ७० टक्के व्यक्तींना सर्वात शेवटी पैसे दिले जातात मात्र हे पैसे दिले जातात कि, नाही याबाबत देखील मोठा संभ्रम आहे. त्यामुळे गोरगरीब व्यक्ती आर्थिक संकटात येत आहे. अशाच प्रकारची भिशी जळगाव शहरातील अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे या भिशीवर प्रशासनाचा अंकुश आहे की यावर कारवाई होणार याची देखील चर्चा सध्या सुरू झाली आहे.
नेमकी कशी असते भिशी योजना लवकरच सविस्तर…





















