जळगाव मिरर | २० जानेवारी २०२५
जळगाव भरारी फाउंडेशनतर्फे येत्या २३ जानेवारी पासून सागर पार्क जळगाव येथे आयोजित करण्यात येत असलेल्या ५ दिवसीय बहिणाबाई महोत्सवाचे भूमीपूजन सोमवारी सायंकाळी के.के.कॅन्सचे संचालक श्री. रजनीकांत कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले.
सागर पार्क येथे आयोजित भूमीपूजनाच्या कार्यक्रमात श्री.रजनीकांत कोठारी यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या यंदाच्या १०व्या वर्षाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सॅटर्डे क्लबचे व्ही. पी. कुलकर्णी, जयेश पाटील, दिपक पाटील, दिनेश थोरात, शैला चौधरी, गायत्री परदेशी, जयश्री ढगे, सुनंदा मोझे, अर्चना जाधव, चित्रा चौधरी, विनोद ढगे, सचिन महाजन, मोहित पाटील, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, अभिषेक बोरसे, दिपक जोशी, नंदकिशोर बारी, कृष्णा चव्हाण आदी उपस्थित होते.
महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून खान्देशातील खाद्य परंपरा तसे सांस्कृतिक चळवळीला चालना देणार्या या महोत्सवात भारुड, लावणी या लोककलेसोबत मराठी संस्कृतीचा फॅशन शो यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रंगणार आहे तसेच २६० महिला बचत गटांनी याठिकाणी स्टॉल आरक्षित केलेले आहेत दि. २३ पासून महिलांसाठी, खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा व शाळा, महाविद्यालयातील ६५० स्पर्धक कलावंत महोत्सवाच्या दरम्यान होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होत आहेत, २३ ते २७ जानेवारी पर्यंत महोत्सव मनोरंजनासाठी खुला असेल, असे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.