
शिवसेना उपमहानगर प्रमुख पदि भूषण जोशी यांची नियुक्ती
जळगाव मिरर | ५ एप्रिल २०२६
दि.५ येथील भूषण संजय जोशी यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उप महानगर प्रमुख पदी निवड करण्यात आली.
नवी पेठ परिसरातील रहिवासी भूषण संजय जोशी यांची नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपमहा नगर प्रमुख पदी निवड करण्यात आली.
या निवडीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील महानगरप्रमुख शरद तायडे मनपा गटनेते अर्शिन बानो शोएब खाटीक यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना उपमहा नगर प्रमुख गणेश गायकवाड शाकीर खान प्रशांत सुरळकर उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे तालुकाप्रमुख प्रमोद घुगे विजय कोळी विभाग प्रमुख शोएब खाटीक किरण भावसार महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील उपमहानगर प्रमुख निता सांगोळे युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी सौरभ चौधरी निलेश ठाकरे बाळासाहेब कंखरे शरद पाटील राजेंद्र तायडे किरण तायडे पप्पू तायडे गोरख केदारे कलीम खान शरीफ रंगरेज निखिल महाजन केतन जैन कुणाल राजपूत वैभव राजपूत प्रफुल्ल नाईक मयूर काटे भूषण राजपूत स्वप्निल कोळी अनिकेत पाटील राहुल अग्रवाल आदि सह शिवसेनिक उपास उपस्थित होते.





















