• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

Big Breking : शिवसेना कुणाची? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची तारीख पे तारीख!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 22, 2022
in क्राईम, प्रशासन, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
बंडखोर खासदार पत्नी शिंदे गटात तर घटस्फोटीत पती शिवसेनेत दाखल
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. कोर्टात शिंदे-ठाकरे गटामध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यात या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सोमवारी २२ ऑगस्टऐवजी आता २३ ऑगस्टला ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारी पोहोचल्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारचं भविष्य नेमकं काय असणार या प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यातच राहिलं. त्यातच आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर गेल्यामुळं सत्ताधाऱ्यांची धाकधुक वाढली आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. परिणामी आज (22 ऑगस्ट) होणारी सुनावणी आता उद्या (23 ऑगस्ट) होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या आजच्या अनुपस्थितीमुळं ही सुनावणी लांबणीवर गेल्याचं सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या अनेक याचिकांमध्ये आता नागरिकांतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करून नागरिक व मतदारांचे म्हणणेसुद्धा एकून घ्यावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, रंजन बेलखोडे, सौरभ अशोकराव ठाकरे (पाटील) यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून दाखल केलेली हस्तक्षेप याचिकेवरही कोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान, दुसरीकडे शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिका पुढील सुनावणीसाठी घटनापीठाकडे सोपवणार का याचा निर्णय न्यायालयात होणार आहे. सदरील सर्व याचिकांवर सोमवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार होती. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून, त्याआधी निर्णय होण्याची आशा शिवसेनेला आहे.

सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना कुणाची या मुद्द्यावर आता निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण आयोगानं दोन आठवड्यांचाच वेळ दिला आहे. २३ ऑगस्टला याची मुदत संपत असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी देखील २३ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.

Related Posts

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!
जळगाव

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत
जळगाव ग्रामीण

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026
कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!
क्राईम

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

November 5, 2026
राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?
क्राईम

राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

November 5, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे
क्राईम

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग; व्यापाऱ्याकडून ४७ लाख उकळल्याचा आरोप!

November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026
जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

November 6, 2026
कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group