
मुबंई : वृत्तसंस्था
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांची आज सकाळी 7.30 वाजल्यापासून त्यांच्या भांडूपमधल्या घरी चौकशी सुरु होती.
आता तब्बल 9.30 तासांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी सव्वासात वाजता ईडीचं पथक संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झालं होतं. त्यांच्या या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास 10-12 ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल होऊन चौकशी केली. त्यानंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.




















