जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२३
मध्य रेल्वेच्या १८३.९४ किलोमीटर लांबीच्या भुसावळ मनमाडदरम्यान थर्ड लाइनचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावर इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने या कालावधीसाठी ३४ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सहा गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या असून, तब्बल २० गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहेत.
१४ ते १५ ऑगस्टदरम्यान १५ तास रेल्वे वाहतूक ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने धावणाऱ्या सुमारे ६० ते ६५ गाड्या प्रभावित झाल्या आहेत. या कालावधीसाठी देवळाली- भुसावळ एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नांदेड एक्स्प्रेस, इगतपुरी भुसावळ मेमू, सीएसएमटी- जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, पुणे- जबलपूर एक्स्प्रेस, दादर गोरखपूर एक्स्प्रेस, मुंबई- नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई- आदिलाबाद एक्स्प्रेस पुणे- नागपूर एक्स्प्रेस, पनवेल- रीवा एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, मुंबई- नांदेड एक्स्प्रेस, मुंबई- सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस, कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस, पुणे- भुसावळ एक्स्प्रेस त्याचप्रमाणे परतीच्या मार्गावरच्या याच सर्व गाड्या १४ ते १५ ऑगस्टला रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे- हावडा, हावडा- पुणे आणि नवी दिल्ली- बेंगलुरू कर्नाटक एक्स्प्रेससह २० गाड्याचे मार्ग बदलले आहेत.