जळगाव मिरर | १९ नोव्हेबर २०२३
राज्याचे माजी मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे आ.एकनाथराव खडसे हे गेल्या काही दिवसापासून मुंबई येथील रुग्णालयात दाखल होवून उपचार सुरु होते. त्यानंतर प्रकुतीउत्तम झाल्यानंतर आ.एकनाथराव खडसे आज सकाळी मुंबई – हावडा एक्स्प्रेसने ते आज जळगावात परतले होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी व पदाधीकाऱ्यानी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी आ.खडसे म्हणाले कि, राज्यातील कार्यकर्ते व जनतेची शक्ती माझ्या मागे असल्याने मला उत्साहाने काम करण्यासाठी संधी मिळाली. तर कार्यकर्त्यांनी माझ्या उत्साहामध्ये स्वागत केले व कार्यकर्त्यांचे हे प्रेम प्रेरणा मला पुढच्या कालखंडात पूरक ठरते अन मी कार्यकर्त्याचा आभारी आहे. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली. तर यापुढे मोठ्या उत्साहाने काम करण्यासाठी संधी मला मिळाली आहे. असे देखील आ.खडसे म्हणाले.