
जळगाव मिरर । ८ जानेवारी २०२३
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापन करण्याच्या पूर्वी अचानक जिल्ह्यातील पाचोऱ्यात कुणाला नाही माहिती दौरा केला होता, त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप आला होता. असाच पुन्हा एकदा पाचोरा तालुक्यात दौरा होत आहे. पण हा दौरा कुठलाही शासकीय नसल्याचेहि खात्रीलायक वृत्त आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी हेलिकॉप्टरने येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा परिसरात बडगुजर समाजाचे आज अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार अशी सर्वत्र चर्चा होती. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून शासकीय दौरा नसल्याचे देखील माहिती समोर आली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बडगुजर समाजाच्या अधिवेशनाला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हेलिकॉप्टरने येणार असल्याची माहिती विश्वासने सूत्रांकडून मिळालेली आहे. यावेळी पालकमंत्र्यांसह अन्य जिल्ह्यातील नेते मंडळांची उपस्थित राहणार आहे.




















