जळगाव मिरर / २३ फेब्रुवारी २०२३ ।
पंजाबमधील अमृतसरमध्ये एक मोठी घडना घडल्याची बातमी समोर आली आहे. वारिस पंजाब दे या खलिस्तान समर्थक संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी येथील अजनाळा पोलीस ठाण्याच्या बाहेर तलवारी आणि बंदुकांसह पोलीस बॅरिकेड्स तोडले. बेशिस्त जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला. दरम्यान, पोलीस हतबल दिसत होते. एएनआय या वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंगच्या जवळच्या साथीदाराला अटक करण्यात आली तेव्हा हा गोंधळ झाला. याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने लोक जमा झाले. आणि काही वेळातच पोलिसांनी बॅरिकेड्स तोडून पोलिस स्टेशनला घेराव घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंगचे समर्थक त्याचा जवळचा सहकारी लवप्रीत तुफानच्या अटकेच्या विरोधात पोलिस स्टेशनबाहेर जमले आहेत. वारिस पंजाब देचे प्रमुख अमृतपाल सिंग यांचे निकटवर्तीय तुफान सिंग यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. अमृतपाल यांनीच गुरुवारी आपल्या समर्थकांना अजनाला येथे पोहोचण्यास सांगितले होते. यानंतर तलवारी आणि बंदुका घेऊन येथे जमाव जमला.
#WATCH | Punjab: Supporters of 'Waris Punjab De' Chief Amritpal Singh break through police barricades with swords and guns outside Ajnala PS in Amritsar
They've gathered outside the PS in order to protest against the arrest of his (Amritpal Singh) close aide Lovepreet Toofan. pic.twitter.com/yhE8XkwYOO
— ANI (@ANI) February 23, 2023
अमृतपाल सिंग, त्याचा साथीदार लवप्रीत तुफान यांच्यासह एकूण ३० जणांविरुद्ध अजनाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतपालविरोधात सोशल मीडियावर टिप्पणी करणाऱ्या तरुणाचे अपहरण केल्यानंतर या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी तुफान सिंगला अटक केली होती. यामुळे अमृतपाल संतापला आणि त्याने गुरुवारी अमृतसरमधील अजनाळा पोलिस स्टेशनबाहेर निदर्शने करत अटकेची घोषणा केली.