जळगाव मिरर / २४ मार्च २०२३ ।
देशाच्या लोकसभा सचिवालयाने आज मोठा निर्णय घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. याबाबतचे आदेश देखील सचिवालयाने जारी केले आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना काल दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १० जुलै २०१३ च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २३ मार्च २०२३ पासून कलम १०२(१)(ई) च्या तरतुदींनुसार त्यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे.
लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ८ चा आधार या निर्णयासाठी घेण्यात आला आहे. काल गुजरातमधील सुरत न्यायालयाने राहुल गांधींना त्यांच्या विधानासाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी ३० दिवसांची मुदतही राहून गांधी यांना दिली होती. २०१९ च्या निवडणुकी दरम्यान कर्नाटकातील एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी देशात पळून गेलेल्या आरोपींबद्दल बोलताना मोदी आडनावा विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.