जळगाव मिरर / १ एप्रिल २०२३ ।
राज्यात ठाकरे गटाचे शिंदेसह भाजपशी मोठा वाद सुरु असतांना ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांच्या मोबाईलवर संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संजय राऊत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. यामध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिद्धू मुसेवालाप्रमाणे AK 47 ने ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारी व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. “दिल्लीत भेट, तुला Ak 47 ने उडवतो. सलमान खान आणि तुझा गेम फिक्स आहे”, असं या धमकीत म्हणण्यात आलं आहे.



















