
जळगाव मिरर | १९ मार्च २०२५
राज्यातील नागपूर शहरात औरंगजेब याच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावावा आवरताना पोलिस आणि नागरिक जखमी झाले आहेत. दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. आता या हिंसाचाराच्या मास्टरमाईंडबाबत मोठा खुलासा झाला आहे. फहीम खान असं त्याच नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. फहीम खान याने लोकांना भडकवण्याचे काम केले. त्यानंतर ही हिंसा घडली. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. फहीम खान यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस स्टेशनवर जमाव जमला. या जमावाने परिसरात कुऱ्हाडी, दगड, काठ्या आदी घातक शस्त्रे हवेत उडवून परिसरात दहशत निर्माण करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून धार्मिक शत्रुत्व वाढविण्याच्या उद्देशाने सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केला. गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये उघड झाले आहे.
या तक्रारीनुसार जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. औरंगजेबाच्या थडग्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. तसेच औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी, लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणि धार्मिक शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने जमावाने कुऱ्हाडी, दगड, काठ्या आणि इतर धोकादायक शस्त्रांचा वापर केला.
नागपूरमध्ये रात्री सोमवारी झालेल्या हिंसाचारात चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावातील काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्याच ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ करण्यात आली, तसेच अश्लील शेरेबाजीही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.