• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोठी बातमी : आ.खडसेंना मोठा धक्का : आ.चव्हाणांनी रद्द केली ती नोकर भरती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 21, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : आ.खडसेंना मोठा धक्का : आ.चव्हाणांनी रद्द केली ती नोकर भरती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २१ जानेवारी २०२३ ।

जिल्ह्यात दुध संघाची निवडणूक चांगलीच गाजली त्यानंतर आ.खडसे यांचा आ.मंगेश चव्हाण यांनी दारूण पराभव केल्यानंतर आज पुन्हा जिल्हा दुध संघाचे नवनियुक्त चेअरमन तथा आ.मंगेश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत आ.एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाच्या काळात जळगाव जिल्हा दूध संघाची वादग्रस्त ठरलेली नोकर भरती रद्द करण्यात आली आहे. नवीन संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा भाजपचे आ.मंगेश चव्हाण यांनी दिली. खडसेंच्या यांच्या नेतृत्वाच्या काळात संघाला तब्ब्ल ९ कोटी ६० लाखांचा तोटा होता. पदभार घेतल्यानंतर एका महिन्यात ९० लाख रूपयांचा नफा मिळविल्याचेही त्यांनी सांगितले.

आज २१ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष आमदार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी संघाच्या कामाकाजाचा आढावा तसेच आर्थिक माहिती घेण्यात आली. संचालक मंडळाच्या कार्यकाळात गेल्या सहा वर्षांत ९ कोटी ६७ लाख रूपयांचा तोटा झाल्याची माहिती या वेळी मिळाली. यात ऑगस्ट २०२२ या महिन्यात प्रशासकीय मंडळ होते. या काळात २० लाख रूपये नफा झाला, तर आता मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नवीन संचालक मंडळाने पदभार घेतल्यानंतर महिनाभरात ९५ लाख रूपयांचा नफा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या महिनाभराच्या काळात संघात होणारा अतिरिक्त खर्च कमी केला आहे. अतिरिक्त असलेले तब्बल २० कामगार कमी केले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जिल्हा दूध संघात सन २०२१मध्ये १०४ कर्मचाऱ्यांची नोकर भरती करण्यात आली होती. राखीव जागाच्या प्रश्‍नावरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यामुळे न्यायालयाने या नोकर भरतीला ‘स्थगिती’ दिली होती. नोकरभरतीचा प्रश्‍न संघाच्या निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात गाजला होता. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असताना या भरतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी गटाने केला होता. त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते. खडसे यांचा पराभव झाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची सत्ता आली. आता या नवीन संचालक मंडळाने वादग्रस्त ठरलेली ही नोकर भरतीच रद्द केली आहे.

याबाबत चेअरमन चव्हाण यांनी सांगितले की, ही नोकरभरती रद्द करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ही नोकर भरती रद्द झाली माहिती आम्ही न्यायालयालाही देणार आहोत. आता संघ तोट्यात असल्यामुळे नोकरभरती करण्यात येणार नाही. ज्यावेळी संघ नफ्यात येईल, त्यावेळी ही भरती करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा दूध संघाचे बटर वाई येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. हा खर्च नेहमीच वादात होता, त्यामुळे आता हे कोल्ड स्टोरेज संघाच्या आवारातच उभारण्यात आले आहे. त्याच ठिकाणी बटर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संघाचे वर्षाला १५ लाख रूपये वाचणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

Related Posts

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा
जळगाव

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !
क्राईम

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !
क्राईम

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा
जळगाव

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group