जळगाव मिरर | ९ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथ खडसे यांना गेल्या तीन दिवसाआधी हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर त्यांना जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले होते. तर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेत तब्येतीची चौकशी देखील केली होती. पण आता त्यांच्या प्रकृतीची अपडेट समोर आली आहे.
एकनाथ खडसे यांच्या एक्स अकाउंटवरून प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ”मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल,’ असं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.