जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच धरणगाव तालुक्यातील वराड येथील बसस्थानकाजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पाळधी येथील दोन तरुण जखमी झाल्याची घटना आज दि.६ डिसेंबर रोजी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील दोन तरुण दुचाकी (एमएच – १९ डिओ- ०६८२) ने जात असताना त्यांच्या दुचाकीला जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या कार (एमएच १९, जे – ०८५०) ने जबर धडक दिली. ही घटना वराड येथील बसस्थानकासमोर घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघे १० ते १२ फूट घसरत गेले असून जखमी झाले आहेत. हा अपघात होताच ग्रामस्थांनी दुचाकीस्वारांना मदत केली. त्यानंतर पोलिस पाटील राजू वाढले, हेड कॉन्स्टेबल सुरवाडे, संदीप पाटील, नीलेश सुरेश भील, बालू नाईक, उमेश बळीराम महाजन यांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले.