अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरात सध्या यात्रा सुरु आहे. यात्रा बघण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भाविक येत असून याचा फायदा चोरट्यांनी घेतला असून एकाची दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे येथील रहिवासी गोविंदराज बोरसे (वय २७) हे दि २० रोजी संध्या.७ वाजेच्या सुमारास श्री संत सखाराम महाराज यात्रा नदी पत्रातील पार्किंगमध्ये दुचाकी एम.एच.१८.ए.क्यू.३४८८ हि लावून गेले होते पण यात्रा पाहून आल्यावर त्यांना कुठेही दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी त्यांनी अमळनेर पोलिसात धाव घेत एका इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.प्रमोद पाटील हे करीत आहेत.