जळगाव मिरर | ५ मे २०२४
देशात लोकसभा निवडणूकीचे वारे लागले आहे जस जस मतदान जवळ येत आहे तस तस ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आप आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करत आहे.महाराष्ट्रातील देखील येणाऱ्या 13 मे ला तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
यातच जळगाव लोकसभा मतदार संघातील निवडणूक ही चुरशीची बनली आहे.भाजपने विद्यमान खासदार यांचे तिकीट कट केल्यानंतर भाजप कडून स्मितावाघ यांना उमेदवारी जाहिर केली त्यात शिवसेना (उबाठा) गटाचे तालुका समन्वयक विजय लाड आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हा महानगर सरचिटनीस गजानन वंजारी यांच्यात अनेक दिवसा पासून वाकयुद्ध रंगले आहे.
एकीकडे शिवसेना उबाठा गटाचे करण पवार विजयी होणार अस म्हणत आहे तर भाजपच्या स्मितावाघ याच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अस भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे.यात आता जळगाव लोकसभा मतदार संघात स्मितावाघ विजयी झाल्यास शिवसेना उबाठा गटाचे तालुका समन्यवक विजय लाड यांनी 21000 ₹ देण्याचे आव्हान दिले आहे तर करण पवार निवडून आल्यास भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटनीस गजानन वंजारी यांनी देखील विजय लाड यांचे आव्हान स्वीकारले आहे.आता 4 जून ला काय होईल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे
