
जळगाव मिरर । ८ डिसेंबर २०२२
गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भारतीय जनता पक्षाला गुजरात मध्ये ऐतिहासिक विजय व हिमाचल प्रदेश मध्ये सुद्धा उल्लेखनीय कामगिरी पार पाडल्याने त्या विजयाचा जल्लोष जळगावातील वसंत स्मृती भाजप कार्यालयात आज पदाधिकाऱ्यानी साजरा केला.
यावेळी पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फाडून व पेढे भरवून तर ‘वंदे मातरम’ भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे, उज्वला बेंडाळे, दीप्ती चिरमाडे, गायत्री राणे, नगरसेवक राजेद्र घुगे पाटील, राजेद्र मराठे, मंगला चौधरी, राहुल वाघ, मनोज भांडारकर, दीपक बाविस्कर, गजानन वंजारी, अश्विन सैंदाणे, विशाल त्रिपाठी, प्रल्हाद सोनवणे, किशोर चौधरी, मिलिद चौधरी, प्रकाश पंडित, संजय भोळे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.




















