जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२४
जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम पाटील यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत बुधवारी दुपारी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालय मुंबई येथे त्यांच्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
श्रीराम पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्व व त्यांची कार्यशैली यावर प्रभावित होऊन त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवत या पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले.
यांनी घेतला पक्ष प्रवेश
यावेळी श्रीराम उद्योग समूह चेअरमन श्रीराम दयाराम पाटील, शितल रमेश पाटील, मा. नगराध्यक्ष नगरपरिषद रावेर, अब्दुल मूत्तलीफ मा. उप. नगराध्यक्ष नगरपरिषद रावेर, सचिन अशोक मोरे उपसरपंच बोरावल ता. यावल, सोपान पाटील संचालक रावेर पीपल बँक, केतन राणे संचालक विकासो विवरे, कुलदीप पाटील संचालक विकासो बोरावल,