जळगाव मिरर | १८ मे २०२३
राज्यातील ठाकरे गट व भाजपमध्ये सुरु असलेल्या वाद कुठेही कमी न होता वाढत चाललेला आहे. नुकतेच भाजपचे नेते नितेश राणे यांनी थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
नितेश राणे म्हणाले कि, उद्धव ठाकरेंना आनंद काँग्रेस जिंकल्याचा आहे की पाकिस्तान? भाजप जिंकलं की भारत माता की जय बोलतात. काँग्रेस जिंकलं की पाकिस्तान जिंदाबाद बोलतात हा फरक आहे, संजय राऊतला मी सांगतो की त्यांनं त्र्यंबकेश्वरला यावं. इकडं जे बोलतात तेच वाक्य तिकडं बोल आणि दोन पायांनी परत येऊन दाखव, असं चॅलेजं नितेश राणेंनी दिलंय.
उरूस जातो. धूप दाखवतात पण आत जाण्याचा हट्ट करत नाहीत. तिथल्या मुसलमानांचा आग्रह होता की चादर टाकायची. जिहादी आहेत. बोलायला फाटल्यावर कोणी स्वत:ला शिवभक्त म्हणेल. आज त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये घुसले. उद्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये घुसतील. हे आम्ही चालू देणार नाही. अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मातोश्रीमध्ये काम केलेला कामगार पडला. गुरुनानक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. सिरियस आहे. पोलिसांनी चौकशी करावी. मातोश्रीमध्ये लोकांना ढकलण्याची सवय आहे. त्यामुळे पडले का ढकलले चौकशी करा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.