अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राहुल गांधी यांच्या प्रतिमेला माजी आमदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, माजी सभापती श्याम आहिरे, सरचिटणीस जिजाबराव पाटील, राकेश पाटील, विजय राजपूत, जिल्हा ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष अजय केले, जि.प.चे माजी सदस्य संदीप पाटील, शरद सोनवणे, बाजार समितीचे संचालक पराग पाटील, सदा बापू, महेश पाटील, दिलीप ठाकूर, चंद्रकांत कंखरे, मच्छिंद्र राजपूत, बापू हिंदुजा, शेखर कुलकर्णी, दीपक पवार, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी राजपूत, पंकज भोई, महिला मोर्चा अध्यक्ष छाया भामरे, युवा मोर्चा सरचिटणीस राहुल चौधरी, समाधान पाटील, महेश संदानशिव, गौरव सोनार, सागर शेटे, रवी ठाकूर, राहुल बडगुजर, निखिल धनगर आदी उपस्थित होते.