जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२४
शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे गुरुशिष्याप्रमाणे असते. गुरुशिष्याचे नाते पवित्र असते. पण या नात्याला काळिमा फासणारी घटना कोराडीत एका शिकवणीवर्गामध्ये घडली. शिकवणीवर्गात विद्यार्थिनी एकटीच बसून असल्याचे पाहून वासनांध शिक्षकाने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अमोल पाटील (४०, रा. येरखेडा, कामठी, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. हि संतापजनक घटना नागपूर शहरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल पाटील हा कोराडीत एका खासगी शाळेवर शिक्षक असून घरी शिकवणीवर्ग घेतो. १५ वर्षीय पीडिता ही त्याच्या वर्गातील विद्यार्थिनी असून तिने आरोपी शिक्षकाकडे शिकवणीवर्ग लावला होता. १५ एप्रिल रोजी सकाळ ९ वाजता शांतीनगर हद्दीत राहणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीची १५ वर्षीय मुलग शिकवणीवर्गाला गेली विद्यार्थी यायचे असल्यामुळे ती वर्गात एकटी बसून अभ्यास करीत होती.
यावेळी पीडिता एकट असल्याचे पाहून आरोप अमोल पाटील याने तिच्याश अश्लील बोलून, तिच्य मनास लज्जा येईल अस् कृत्य करून विनयभंग केला. हा प्रका कोणाला सांगितल्यास पाहून घेण्याची धमक दिली. पीडित मुलीने घरी आल्यावर आईल तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगन पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध विविध कलम तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्ह दाखल करून शोध सुरू केला आहे.