नई दिल्ली : वृत्तसंस्था
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घातला आहे. हि घटना बघून तुम्हाला हसायलाही येईल आणि आश्चर्चही वाटेल. एकाने मंदिरात चोरी केली आहे. यानंतर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओमध्ये प्रदेशातील जबलपूर येथील आहे.
काय आहे घटना
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मंदिरात भक्त म्हणून आरामात प्रवेश करताना दिसत आहे. मग तो मंदिरात माँ दुर्गाला नमन करतो आणि त्यानंतर तिथे ठेवलेली दानपेटी उचलतो आणि चोरून घेऊन जातो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो माणूस चेहरा झाकेला आहे आहे. त्यानंतर देवीच्या मंदिरात अगदी सहजतेने पोहोचते. मग हात जोडून श्रद्धेने नतमस्तक होतो. काही वेळ नतमस्तक झाल्यावर ही व्यक्ती अगदी निवांतपणे तिथे ठेवलेली दानपेटी उचलते आणि तिथून पोबारा करतो.
चोरी का पेशा अपनी जगह,और आस्था और श्रद्धा अपनी जगह,#जबलपुर : चोर ने दोनों हाथ जोड़ पहले लक्ष्मी मां से लिया आशीर्वाद फिर की मंदिर में चोरी,चोर फरार,सीसीटीवी में कैद हुई घटना,वीडियो हो रहा वायरल pic.twitter.com/0OddiCulpU
— Vikas Singh Chauhan (@vikassingh218) August 9, 2022
या चोरीबद्दल सोशल मीडियावर यूजर्स आपल्या विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, चोराने मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी हात जोडून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेतला आणि नंतर मंदिरात चोरी केली. एका युजरने लिहिले आहे की, चोरीच्या धंदा वेगळा आणि श्रद्धा आणि आदर हे वेगळे आहेत. चोरट्याने आपले दोन्ही हात जोडून आधी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेतला आणि नंतर मंदिरात चोरी केली. दरम्यान, अजून या चोराला पकडण्यात आले नाही.
राजन नावाच्या युजरने लिहिले आहे की, चित्रपटांमध्ये पाहिले होते, मात्र, आज प्रत्यक्षात हा प्रकार पाहतो आहे. तर धीरज कुमार सिंह यांनी लिहिले की, काहीही असो, श्रद्धा असते. या व्हिडिनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.