
जळगाव मिरर / ४ नोव्हेंबर २०२२
एंरडोल तालुक्यातील एका गावातील शेत शिवारात लाखों रुपयाच्या गाजांची लागवड होत असलेल्या ठिकाणी एरंडोल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत छापा मारला आहे. याबाबत एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सविस्तर वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील धारागीर हद्दीतील खडकेसीम शेतशिवारातील गट नं.12 मधील डिंगबर पंडीतराव पाटील तसेच गट नं. 20/01 मधील नितीन डिगंबर पाटील यांच्या मालकीचे तुर पिकाचे शेतात गांजा मादक पदार्थाची लागवड करून त्याचे संगोपन केले जात असल्याची खात्रीलायक माहिती एरंडोल पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना मिळताच त्यांनी ही माहिती वरिष्ठांना देत एरंडोल पोलिस स्थानाकाचे सपोनि गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहवा अनिल पाटील, विलास पाटील, राजेश पाटील, पोना अकिल मुजावर, मिलीद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, पोशि पंकज पाटील, चापोहवा हेंमत घोंगडे होमगार्ड पीओ दिनेश पाटील (छोटु पहलवान) तसेच शासकीय पंचासह जावुन छापा टाकला असता, सदर गट नं. 20 /1 व 12 मधुन एकुण 11 एकर शेतातुन 875 किलो 61,25000/- रुपये किंमतीचा तसेच 70,000/- किंमतीची होंडा कंपनीची सीबी शाईन क्रं. 10 6294 ही जप्त करण्यात आली आहे. असा एकुण 61,95,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदरचे शेत मालक हे गुजरात येथील रहिवासी असून, त्यांनी सदरचे शेत हे जुपने कसण्यासाठी इसम नामे मेरसिंह खरटे गाठीया खरटे रा. ढेढगा फाल्य मुलवानीया कबरी, खरगोन राज्य मध्यप्रदेश यास दिले असल्याची माहीती स्थानीक रहीवासीकडुन प्राप्त झाली आहे आरोपीत इसमाने पोलीसांची कुणकुण लागताच पोबारा केल्याची प्राथमीक माहीती प्राप्त झाली असुन, सदर बाबत पोहवा विलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून, सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन, पूढील सखोल तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत.




















