जळगाव मिरर | २९ जुलै २०२५
देशातील झारखंड राज्यातील देवघर जिल्ह्यातील मोहनपूर पोलीस स्टेशन परिसरातील जमुनिया वळणाजवळील गोड्डा देवघर मुख्य रस्त्यावर मंगळवारी सकाळी एक मोठा अपघात झाला आल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी एका बसची ट्रकला जोराची धडक बसली आहे. धडक एवढ्या जोरात होती कि बसमधील १८ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. अपघातात जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच वेळी, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपस पोलीस करत आहेत.
आज पहाटे ५:३० वाजता ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक लोकांनी मोहनपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रियरंजन यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर प्रियरंजन कुमार एका पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर मोहनपूर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरना याची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून जखमींना रुग्णवाहिकेद्वारे मोहनपूर सीएचसी येथे पाठवले. स्थानिक लोकांनी दावा केला आहे की अपघातात २० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की बसचे तुकडे झाले. दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली असल्याचेही सांगण्यात येत आहे.
