
जळगाव मिरर । १९ नोव्हेबर २०२२
शहरातील पिंप्राळा परिसरातील एका दुकानात पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकीत तब्बल २ लाख रुपयांचा गुटख्याच्या मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियाचे धाबे दणाणून गेले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्कटजवळील सावरकर नगरातून ६ गोणी गुटखा ज्याची एकूण किमत २ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. संशयित आरोपी वसिम चंगा शहा (वय ३०) याच्या दुकानातील गोडावून मधून हा माल ताब्यात घेण्यात आला असून पुढील कार्यवाही सरू होती. हि कारवाई जळगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे. या कारवाईत पीएसआय सनिल पाटील, महेश महाले, रविद्र मोतीराया, मिनल साकळीकर, विजय काळे, कैलास सोनवणे यांच्यासह रामानंद पोलीस स्थानकाचे पीएसआय शांताराम पाटील, विकास महाजन, सुनील पाटील, विनोद सूर्यवंशी, चेतन अहिरे, वासुदेव मोरे यांनीहि कारवाईत सहभागी होते. तर अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी किशोर साळुखे यांचा हि सहभाग होता.




















