
जळगाव मिरर / ७ नोव्हेंबर २०२२
जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांची बदली झाल्यानंतर नागपूर लोहमार्गाचे पोलिस अधिक्षक एम.राजकुमार यांची जळगाव जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकपदी वर्णी लागली होती तर आज 7 रोजी जळगाव शहराचे उपविभागीय पोलिस अधिक्षकारी कुमार चिंता यांची गडचिरोली अपर पोलिस अधिक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे.
जळगाव शहरात उपविभागीयपदी कुमार चिंता ज्यावेळेस शहराचा पदभार घेतल्यानंतर कुमार चिंता यांनी अवैध धंदेधाल्यांचे चांगलेच धाबे दणाणूण टाकले होते. त्याच्या कार्यकाळात सर्वच अवैध धंदेवाले त्यांच्या नावावर घाबरत होते.





















