जळगाव मिरर | ९ जुलै २०२५
देशातील गुजरातमधील वडोदरा याठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. पूल कोसळून ४ वाहने नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ५ जणांना वाचवण्यात आले. आज सकाळी गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर किमान चार वाहने नदीत पडली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पद्रा पोलिस निरीक्षक विजय चरण यांनी,”आतापर्यंत चार जणांना वाचवण्यात आले आहे आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे” असे म्हटले.
पोलीस अधिकाऱ्याने याविषयी बोलताना,”राज्य महामार्गालगत महिसागर नदीवर असलेला गंभीरा पूल आज सकाळी ७.३० वाजता कोसळला.”असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “सकाळी ७.३० वाजता महिसागर नदीवरील पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर सुमारे चार वाहने नदीत पडली. दोन ट्रक आणि दोन व्हॅनसह वाहने नदीत पडली. आतापर्यंत आम्ही चार जणांना वाचवले आहे.”
सुरुवातीच्या वृत्तानुसार, पूल कोसळला तेव्हा एक ट्रक, एक व्हॅन आणि एक कार पूल ओलांडत होती, ज्यामुळे सर्व वाहने खाली नदीत पडली. पूल कोसळल्यानंतर लगेचच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आपत्कालीन सेवांना माहिती दिली. पोलिस आणि आपत्ती प्रतिसाद पथके घटनास्थळी दाखल झाली आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही घटना सकाळी ७:३० च्या सुमारास घडली.
“पुलाचा एक भाग अचानक कोसळला. त्या भागातून जाणारी तीन वाहने खाली नदीत पडली. आम्ही बचाव कार्य सुरू केले आहे आणि १० जणांना नदीतून बाहेर काढण्यात आले आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. कोसळलेला पूल वडोदरा शहरापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे आणि सौराष्ट्रकडे जाणाऱ्या वाहतूक वाहनांसाठी एक महत्त्वाचा मार्ग म्हणून काम करतो.
