जळगाव मिरर / ३० ऑक्टोबर २०२२
गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या पूलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केबल पूल कोसळल्यामुळे चारशे लोक नदीत बुडाले आहेत. या अपघातात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला आहे.
મોરબીમાં ઝૂલતો પુલ તૂટવાની દુર્ઘટનાથી અત્યંત વ્યથિત છું. તંત્ર દ્વારા રાહત અને બચાવની કામગીરી ચાલુ છે. ઇજાગ્રસ્તોને સત્વરે સારવારની વ્યવસ્થા માટે તંત્રને સૂચના આપી છે. આ સંદર્ભે જિલ્લાતંત્ર સાથે સતત સંપર્કમાં છું.
— Bhupendra Patel (Modi Ka Parivar) (@Bhupendrapbjp) October 30, 2022
मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतरही आज ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. गुजरातमधील मोरबी येथे माच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. छठ पूजासाठी येथे शेकडो लोक उपस्थित राहिले होते. यावेळी पूलावर असणारे चारशे पेक्षा जास्त लोक नदीत बुड्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलाची दुरुस्ती केली होती. या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री बूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, “मोरबीमध्ये केबल पूल कोसळल्यामुळे दुर्घटना झाली आहे, याचं मला दु:ख वाटत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेहण्याचं काम सुरु आहे. जखमींवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनासोबत संपर्कात असून बचावकार्य आणि दुर्घटनेची माहिती घेत आहे.”
मोरबीचा हा झुलता पूल 140 वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे 765 फूट आहे. हा झुलता पूल केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा मानला जात असे. 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. ते 1880 मध्ये त्यावेळी सुमारे 3.5 लाख खर्चून पूर्ण झाले. त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आले होते. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या मदतकार्य सुरू आहे. बचाव पथकासोबतच शेकडो स्थानिक लोकही बचाव कार्यात सहभागी आहेत. नदीत उतरून लोकांना बाहेर काढले जात आहे.
बातमी वेळोवेळी अपडेट होत आहे
#WATCH | Several people feared to be injured after a cable bridge collapsed in the Machchhu river in Gujarat's Morbi area today. Further details awaited. pic.twitter.com/hHZnnHm47L
— ANI (@ANI) October 30, 2022