जळगाव मिरर । २२ नोव्हेबर २०२२
जळगाव शहरातील वाघ नगरातील एका घरातून चोरट्यांनी ७३ हजाराची रोकडसह सोने चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाघ नगर परीसातातील साईछत्र चौकातील रहिवासी महेश दिलीप प्रजापती(वय ३१) यांच्या मालकीच्या घरातून दि १५ रोजी ते १८ च्या सकाळपर्यंत अनोळखी इसमांनी त्यांच्या घरात ठेवलेले सोन्याची मंगलपोत व कानातील टाप्स यासह २३ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट देत पाहणी करून या प्रकरणी महेश प्रजापती यांनी तालुका पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे हे करीत आहेत.