जळगाव मिरर । २४ नोव्हेबर २०२२
शहरातील सोनाई नगरात किराणा दुकानदाराच्या घरात अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करीत तब्बल ७२ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने लंपास केले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करणारे सोनाई नगरातील रहिवासी कृष्णा महादू जाधव (वय ५२) यांच्या राहत्या घरातून दि २२ रोजी अनोळखी चोरट्यांनी घरात घुसत बंद घराच्या दरवाज्याचा कोंडा तोडून घरातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, १४ हजार किमतीचे चांदीचे बावठे, १० हजार रुपये किमतीचे सोन्याची अंगठी, ७ हजार ५०० रुपयाची रोकड असा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दीपक बिरारी हे करीत आहेत.
