
धानोरा ता. चोपडा – प्रतिनिधी
जळगांव डेपोची मुक्कामी मांजरोद -जळगांव एसटी बस क्र.एम.एच बीटी २३६४ ही गाडी धानोरा येथून गुरुवारी सकाळी आठ वाजता आपल्या मार्गस्थ निघाली होती . बेमोसमी पाऊस सुरू असतांना बस वरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरून बस अचानक घसरून सरळ बाजूच्या ब्रासमध्ये गेली. या अपघातात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
घटनास्थळी गाडीचे वाहक पवार नामक यांनी समयसुचकता दाखवित जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार पेटी उघडून तात्काळ उपचार केले . सदर घटनेची माहिती मिळताच धानोरा येथील ज्ञानेश्वर सोनवणे, गणेश चौधरी , पिंटू कोळी, किरण साळुंके, वैभव साळुंके , वाल्मीक पाटीलसह आदी ग्रामस्थांनी जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात मध्ये उपचारासाठी मदतकार्य केले.




















