जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२३
२०२३ वर्ष संपत आले असून आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला लग्नसराईचे मुहूर्त ठरविले जातात. सध्या याचं मुहूर्तासाठी सराफ बाजारात सोने खरेदीसाठी रेलचेल दिसून येत आहे. मात्र अशास्थितीतच सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत.
सध्या 24 कॅरेट सोने 63 हजारांच्या वर व्यवहार करत आहे. मात्र यापूर्वी सोने 60 हजार रुपयांच्या भावात खेळत होते. आता सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांची निराशा झाली आहे. तुम्ही जर लग्नसराईसाठी सोने खरेदी करत असाल तर आजचे भाव तपासून घ्या.
मंगळवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,400 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,710 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,400 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,710 रुपयांनी व्यवहार करत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सोन्याचे हेच दर 60 हजार रुपयांमध्ये व्यवहार करत होते. मात्र आता या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 58,400 रुपये
मुंबई – 58,400 रुपये
नागपूर – 58,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,710 रूपये
मुंबई – 63,710 रूपये
नागपूर – 63,710 रूपये