मुंबई : वृत्तसंस्था
भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी आज एका सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयने सोलापूरस्थितलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. सहकारी बँकेकडे भांडवल आणि कमाईची क्षमता शिल्लक नाही. तसेच लक्ष्मी सहकारी बँक गुरुवारी 22 सप्टेंबर व्यवसाय बंद झाल्यानंतर आपला व्यवसाय बंद करेल, असं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.
सहकारी बँक बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या आवश्यकतांचं पालन करण्यात अयशस्वी ठरली. त्यामुळे आता बँक सुरु ठेवणं ठेवीदारांच्या हिताचं नसल्याचं आरबीआयने नमूद केलं.
Reserve Bank of India (RBI) cancels the licence of The Laxmi Co-operative Bank Ltd, Solapur, Maharashtra; depositors can claim up to Rs 5 lakhs, says RBI.
— ANI (@ANI) September 22, 2022
“सहकारी बँकेने सादर केलेल्या डेटानुसार, 99 टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून मिळण्याचा अधिकार आहे. 13 सप्टेंबर 2022 पर्यंत DICGC ने एकूण विमा रकमेपैकी 193.68 कोटी रुपये आधीच भरले आहेत”, असं आरबीआयने निवेदनात म्हटलंय.