जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२४
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विध्यमाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात जिल्हास्तरीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षनाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल या प्रमुख पाहुणे तर डाएटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे हे अध्यक्ष म्हणून यावेळी उपस्थित होते तसेच डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रतिभा भावसार, डॉ. सी. डी. साळुंखे व डॉ. जगन्नाथ दरंदले यांचा देखील यावेळी समावेश होता. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची असते त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे. शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायचा असतो.
तसेच शिक्षकांनी सध्याच्या शिक्षण प्रवाहातील नवतंत्रज्ञान आत्मसात करायला हवे असे सांगत त्यांनी यावेळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली.
विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शैक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून स्वायत्त जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात मेजर-मायनर प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० च्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु झाल्याचे सांगत या धोरणामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन सर्वांचेच उत्तरदायीत्व वाढणार असून थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जाणार आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले.
यानंतर डाएटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी नवीन शैक्षणिक धोरण, २०२० च्या अनुषंगाने शिक्षण प्रक्रियेत चालू असलेले बदल व धोरणात नमूद सर्व शिक्षकांसाठी दरवर्षी ५० तासिका स्वतःचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास (सीपीडी) करण्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे तसेच शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षणात १२ विषयांचा समावेश होता त्यामध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, कुमारवयीन मुलांचे भाव विश्व उलगडताना, क्षमता आधारित मूल्यांकन व शाळा स्तर मूल्यांकन माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग, कृती संशोधन व नवोपक्रम अनुभवजन्य व खेळधारित अध्यापनशास्त्र, 21 व्या शतकातील कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन, NAS अहवाल विश्लेषण, प्रभावी शैक्षणिक नेतृत्व यांसारखे विविध विषय त्यांनी आपल्या मार्गदर्शनात हाताळले. परिषदेचे मा. संचालक, सहसंचालक, उपसंचालक व सर्व अधिकारी यांच्या वतीने सर्व प्रशिक्षणार्थी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तीन दिवसीय प्रशिक्षणासाठी संपूर्ण जिल्हाभरातून सुमारे २०० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. तसेच जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटने कार्यक्रमासाठी उत्तमरित्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल परिषदेच्या वतीने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले, तर अधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ दरंदले यांनी आभार मानले..